Take a fresh look at your lifestyle.

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; 20 जणांना अटक

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने श्रीरामपूरात मटका व जुगार अड्ड्यावर छापा टाकून तबबल 20 जणांना ताब्यात घेतले.

मध्यंतरी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दारूच्या अड्ड्यावर केलेली कारवाई सोडल्यास राजरोसपणे सुरू असलेले मटका, दारूचे अड्डे, पत्त्यांचे डाव असे काहीसे चित्र श्रीरामपूरचे होते. आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने छापा टाकून यावर शिक्कामोर्तब केले. मटका व जुगाराच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात तबबल 20 जणांना ताब्यात घेतले. दिनेश माखीजा, चंद्रकांत गुडदे, अमरजित बिबवा, वसीम शेख, जावेद मलिक, रोहिदास अडांगळे, बाळू पवार, सुखदेव गांगुर्डे, जाफर करीम शेख, जुनेद मेमन, सतीश शेळके, सलमान कुरेशी, जैनुद्दीन शेख, अमजदखान पठाण, आकाश गायकवाड, तुषार नानेकर, राजेश गोसावी, अजमल शेख, सरफराज शेख, अजीज भाई आदीं विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे बतवणीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही तीन वाहनातून इराणी मोहल्ल्यात दाखल झाले. मात्र त्यांना हवा असलेला आरोपी मिळाला नाही. दरम्यान, शहरात दोन दिवसात गंठण चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. तसेच औरंगाबाद येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद पोलिसांच्या हवाली केले. आजूबाजूला गुन्हे घडत असताना श्रीरामपूर पोलिसांची भूमिका वादातीत राहत असल्यानेच महानिरीक्षकांच्या पथकाने थेट छाप टाकत शहर पोलिसांना अंग झटकायला भाग पाडले.

Leave A Reply

Your email address will not be published.