Take a fresh look at your lifestyle.

मनसेचे संदीप देशपांडें पोलीस कर्मचाऱ्याला धक्का देऊन पळाले, गुन्हा दाखल होणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज ठिकठिकाणी मनसेसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केले होते. पण, मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandep deshpande) कारमधून पळून गेले होते. यावेळी कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Free LPG Gas Cylinder – Paytm वापरा आणि फ्री मिळवा गॅस सिलेंडर, बुक करण्याची सोपी प्रोसेस पाहा

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी आधीच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. मुंबईतही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून बसून पळून गेले.

अखेर मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधाराचे नाव समोर! एनआयएनचा मोठा खुलासा

यावेळी भरधाव वेगात कार दामटल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. महिला कर्मचारी खाली पडल्यानंतरही संदीप देशपांडे यांनी कार न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. पण, अखेरीस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेच.

सध्या जखमी पोलीस महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवला जात आहे. तिने दिलेल्या जबाबावरुन संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा नोंदवायचा की नाही ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पोलीस अधिकारी या महिला कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवायला हॉस्पिटलमध्ये गेले आहेत.

17 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 749 रुपयांमध्ये, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणती कोणती कलम लावली हे लवकरच स्पष्ट होईल. पण सरकारी कामात अडथळा आणणे हे कलम लावतील अशी माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.