Take a fresh look at your lifestyle.

लॉजवर पोलिसांचा छापा; दोन पिडीत महिलांची केली सुटका

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : गुरुवार (दि, 17) Dysp संदिप मिटके, श्रीरामपूर विभाग यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉजमध्ये लॉजमालक भगवान विश्वासराव क्षत्रीय (वय 68, रा वैभव लॉज, वॉर्ड न 5, श्रीरामपूर) हा हायप्रोफाइल महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे बातमी मिळाली. त्याप्रमाणे Dysp मिटके यांनी PI सानप श्रीरामपूर शहर व अंमलदार यांचे पथक तयार करुन वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय, विश्वास रामप्रसाद खाडे (वय 26, रा कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्) यांस ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, Api विठ्ठल पाटील, PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ, पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.