Take a fresh look at your lifestyle.

POLICE RECRUITMENT राज्यात तब्बल इतक्या जागांसाठी पोलीस भरती: या तारखेपासून सुरू होणार प्रक्रिया

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – POLICE RECRUITMENT पोलिस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी केली. १५ हजार जागांसाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर भरती (Police Recruitment In Maharashtra) प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलिस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलिस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भरती प्रक्रियेची तारीख जाहीर केल्याने पोलिस दलातील सेवेसाठी इच्छुक तरुणांचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘राज्यात १५ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

PM Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेविषयी मोठी बातमी! मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम

गृह विभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे; तसेच सात हजारांच्या भरती प्रक्रियेला १५ जूनपासून सुरुवात होईल. पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून, मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे,’ असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

घरघुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी तुमच्या खात्यात जमा झाली का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

‘पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदल्या करण्यात येणार नाहीत; परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. उपअधीक्षकपदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. बदल्यांसंदर्भात पारदर्शकता पाळली जाईल,’ असे वळसे पाटील यांनी सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.