Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसचे नाराज नेते आझाद आणि शरद पवार यांची भेट

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी देशाच्या पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी चार राज्यात वर्चस्व राखण्यात भाजपाला यश मिळालं. त्यानंतर देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी होतांना दिसत आहेत. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर आहे. शिवाय, या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यात यावा या मागणीने देखील जोर धरला आहे.

महत्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी करणाऱ्या ‘G-23’ या नेत्यांच्या गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. मात्र, या भेटीदरम्यान, दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती देण्यात आलेली नाही. पवारांच्या दिल्लीतील घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील पराभवानंतर ‘जी 23’ गटाने काँग्रेसच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आझाद यांची भेट घेतली होती. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यूपीएचे अध्यक्षपद पवार यांना मिळावे, असा प्रस्ताव मंजूर केला होता. तर दुसरीकडे बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बिगर काँग्रेस-बिगर भाजप पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भाजपविरोधात एकवटण्यासाठी लिहिलं पत्र लिहिले होते. यापार्श्वभूमीवर पवार आणि आझाद यांची भेट महत्वाची मानली जात आहे. मात्र, ही भेट नियमित भेट असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.