Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट विश्वात खळबळ! IPL सुरु असतानाच ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक निर्णय; महत्वाचं कारण समोर

0

ओटीटी न्युज नेटवर्क

मुंबई – बहुप्रतिक्षित राहिलेल्या IPL चा 15 वा सीझन सध्या सुरु आहे. अशातच क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.IPL 2022 साठी मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) टीमचा महत्त्वाचा भाग असलेला वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) सध्या आयपीएल 2022 साठी (IPL 2022) भारतात आहे. मात्र, यावेळी आयपीएलच्या या सीझनमध्ये पोलार्डचा करिष्मा खास चालला नाही. यावेळच्या त्याच्या निराशाजनक खेळाचा परिणाम मुंबईच्या कामगिरीवर झाल्याचं पाहायला मिळतंय. या हंगामातल्या पहिल्या तब्बल 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाल्याचं चित्र आहे.

तुमच्या जिल्ह्याचे असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अशाच, IPL खेळण्यासाठी भारतात असलेल्या पोलार्डने धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय पोलार्डने (Kieron Pollard Retirement) घेतला आहे. जगातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये विक्रम करणाऱ्या पोलार्डने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

Phone Tapping Case – संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

पोलार्डची एक फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दहशत होती. पोलार्ड कधीही येऊन कोणताही सामना एकहाती फिरवू शकत होता. पण त्याला आपली ही दहशत कायम ठेवता आली नाही गेल्या काही सामन्यांमध्ये तर त्याच्याकडून चांगली कामगिरी होताना दिसत नाही. त्यामुळे वाईट फॉर्म हे यामागचं पहिलं कारण असावं.

पोलार्डला गेल्या काही सामन्यांमध्ये पाहिलं असेल तर त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी अजूनही करता आलेली नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये तो सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे आपण कमावलेल्या नावाला बट्टा लागू नये आणि चाहत्यांमध्ये आपली प्रतिमा मलीन होऊन नये, यासाठी पोलार्डने हा निर्णय घेतला असावा.

EPFO Salary Limit – आता हातात सॅलरी कमी आली तरी नोकरदारांनाच होणार मोठा फायदा; कसे ते वाचाच

ऑलराऊंडर असलेल्या 34 वर्षांच्या पोलार्डने 123 वनडेमध्ये 26.02 च्या सरासरीने आणि 94.42 च्या स्ट्राईक रेटने 2,706 रन केले, यात 3 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता, याशिवाय त्याने 55 विकेटही घेतल्या. तसंच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.31 ची सरासरी आणि 135.14 च्या स्ट्राईक रेटने 1569 रन केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत, तसंच त्याने 42 विकेटही मिळवल्या. 2012 साली वेस्ट इंडिजने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पोलार्ड त्या टीमचा सदस्य होता.

KGF-2 रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी वाचाच; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं

पोलार्ड आता ३५ वर्षांचा होणार आहे, त्याचबरोबर त्याचं शरीर हे धष्टपुष्ट आहे. त्यामुळे असं शरीर घेऊन जास्त काळ फिट राहणं सोपं नसतं. जर फिट नसताना खेळलो आणि दुखापत झाली तर ती महागात पडू शकते, असा विचारही पोलार्डने केला असावा. त्यामुळे फिटनेसचा विचार करत त्याने हा निर्णय घेतला असावा.

पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता वेस्ट इंडिजकडून खेळू शकत नाही. त्याचबरोबर तो आता ट्वेन्टी-२० विश्वचषकही खेळू शकत नाही. यापुढे त्याला वेस्ट इंडिजकडून एकही सामना खेळता येणार नाही. त्यामुळए पोलार्डला देखील या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटत असावे.

सेकंड हॅन्ड Two Wheeler चा बंपर Sale! केवळ १६ हजारांत मिळतेय Activa तर २० हजारांत मिळतेय Pulsar

Leave A Reply

Your email address will not be published.