Take a fresh look at your lifestyle.

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाहीये. कारण, जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

चीन आणि युरोपमधील काही शहरांमध्ये तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. अशातच आता भारतात सुद्धा कोरोनाची चौथी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौथी लाट येणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?

500 रुपयांच्या नोटबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या माहिती अन्यथा बसेल लाखोचा फटका

जालन्यात पत्रकारांसोबत संवाद साधत असताना राजेश टोपे म्हणाले की, “युरोप, दक्षिण कोरिया आणि चीन या भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतायत. त्यामुळे आपण बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्याला आलेलं आहे. हे पत्र जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे पाठवण्यात आलं आहे. या पत्रानुसार जिल्ह्यांमध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल.”

हेही वाचा – अमित शहांनी समजावूनही राणे नाराजच; भाजपतील गटबाजी कायम

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, जिल्हा जिल्ह्यातील प्रशासन याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे काम करेल. पुढच्याला ठेच मागचा सावध अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. याबाबत राज्य सरकार योग्य ते काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

कोरोनामुळं चीनची भयंकर अवस्था

हेही वाचा – अलर्ट! तुमचं सीमकार्डच करू शकतं तुमचं बॅंक खातं रिकामं, जाणून घ्या सविस्तर

दुसरीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा एकदा चीनची भयंकर अवस्था झाली आहे. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, चीनमध्ये दिवसागणिक एक हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. चीनमध्ये 2021 वर्षामध्ये केवळ 15,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 2022 च्या 3 महिन्यांत संक्रमितांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.