Take a fresh look at your lifestyle.

पोस्ट ऑफिसची खास योजना; वाचा किती महिन्यात होतील पैसे दुप्पट?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस, बँकांच्या विविध योजना, म्युच्युअल फंड इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर, भारतीय पोस्टच्या विविध बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः पोस्टाच्या योजनांमध्ये बचत करणे अधिक सुरक्षित मानले जाते. पोस्टचे किसान विकास पत्र बचतीसाठी अतिशय चांगला पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवले तर ते 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.

पोस्ट ऑफिस बचत योजनेत तुम्ही खूप कमी रकमेतून गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेचा विचार करता, बचत सध्या वार्षिक ६.९ टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. हा व्याज दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ दिले जाते.

देशांतर्गत भाववाढ नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय; रवा, मैदा व पीठ निर्यातीवर सरकारची करडी नजर

किसान विकास पत्र योजनेचे खाते काही अटींच्या अधीन राहून मुदतपूर्तीपूर्वी कधीही बंद केले जाऊ शकते. एकल खातेदार (Single account holder) किंवा संयुक्त खाते ( joint account) असल्यास, खातेधारकाच्या मृत्यूनंतर खाते बंद केले जाऊ शकते. याशिवाय, खात्यात पैसे जमा केल्याच्या तारखेपासून किंवा न्यायालयाच्या आदेशाने दोन वर्षे आणि सहा महिन्यांनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी एक प्रौढ आणि तीन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे संयुक्त खाते (Joint Account) उघडू शकतात. या योजनेअंतर्गत अल्पवयीन किंवा मानसिक आजारी व्यक्ती त्यांच्या पालकांमार्फत खाते उघडू शकतात.

कोरोना, मंकीपॉक्सनंतर लँग्या व्हायरसचा उद्रेक; कशी आहेत लक्षणं?

किसान विकास पत्र अल्पबचत योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये (Post Office Scheme) 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागते. या योजनेत बचतीची कमाल मर्यादा नाही. या योजनेंतर्गत जमा केलेली रक्कम वेळोवेळी ठेवीच्या तारखेपासून वित्त मंत्रालयाने विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीनुसार परिपक्व (Mature) होते. एकूणच पोस्टची किसान विकास पत्र योजना बचतीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा (refund) देणारी आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.