Take a fresh look at your lifestyle.

पोटरा, तिचं शहर होणं, पांडीचेरी, राख आणि पल्याड मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं शहर होणं, पांडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

पर्यटन : महाराष्ट्राच्या वैभवात वाढ होणार; मुंबईतील १३ स्थळांची ‘नाईट टुरिझम’साठी निवड

सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, एफटीआयआय चे धीरज मेश्राम, युनेस्को चे ज्युरी मनोज कदम, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता.या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : आज ११६५ सरपंचांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार;१८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यात मतदान सुरु

हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.