Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रावर मोठं विजेचं संकट! मविआ सरकारच्या मदतीला धावून आल्या सोनिया गांधी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या महाराष्ट्रात नागरिकांना मोठ्या प्रमाणात लोड शेडींगच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राज्यभरात कोळश्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं चित्र आहे. एकीकडे सध्या जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या मदतीसाठी छत्तीसगडची काँग्रेस सरकार आली आहे.

महत्वाचं म्हणजे छत्तीसगडमधील कोळश्याची एक खाणचं महाविकास आघाडी सरकार ऊर्जा विभागासाठी घेण्याचा प्रयत्न असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देखील तश्या सूचना छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारला केल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

मोदी सरकार तुमच्या खात्यात जमा करणार दरमहा ‘५ हजार’ रुपये; विवाहित असाल तर मिळणार डबल फायदा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे पुण्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांच्या गौरव सोहळ्याचे पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय


राज्यात लोडशेडिंग जरी चालू असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्थरावर एक बैठक घेण्यात आली आहे. त्यात दर आठवड्याला ऊर्जा विभागाची माहिती घेऊन देशात कुठं वीज उपलब्ध आहे. याबाबत माहिती घेतली जाणार आहे. लोडशेडिंग न ठेवता सुरळीत वीज पुरवठा कसा देता येईल यासाठी प्रयत्न केलं जाणार आहे. पण देशातील अनेक राज्यात कोळसा बाबत जेवढा पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. म्हणून काही प्रमाणात परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

BREAKING! PM Modi यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला; चकमक अजूनही सुरूच

Leave A Reply

Your email address will not be published.