Take a fresh look at your lifestyle.

Pre Monsoon Rain Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ जिल्ह्यांना झोडपलं

ओटीटी न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग – महाराष्ट्रात सध्या सगळ्यांनाच मान्सूनची प्रतिक्षा आहे. पण हवामानात होणाऱ्या बदलांमुळे पावसाला येण्यास विलंब होत आहे. अशात मात्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातल्या अनेक जिल्ह्यांसह नवी मुंबईतही पावसाच्या सरी बरसल्या. या मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा थोडा का होई ना सुखावला आहे.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात कोकणातील पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. रत्नागिरी-लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह लांजा तालुक्याला पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर भारताची दुसरी चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग आंबोलीत मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस झाला.

🤩Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

पुढील ३ ते ४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मृग नक्षत्राच्या पूर्व संध्येला पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल एक तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. कर्नाटक आणि गोवा इथं मान्सून रेंगाळत असतानाच सायंकाळी आबोलीत पावसाने जोरदार हजेरी लावली.

सिंधुदूर्गमध्ये ढगाळ आणि दमट पावसाळी वातावरण असून काही भागात पुढील ३ ते ४ तासांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.