Take a fresh look at your lifestyle.

प्री-ओपनिंग शेअर बाजारात तेजी; निफ्टीने ओलांडला १७ हजार ४५० चा टप्पा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

Share Market : आज भारतीय शेअर बाजाराने चांगली सुरूवात केली आहे. प्री-ओपनिंग (Pre Opening) सत्रात बाजारात तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारातही खरेदीचा प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

आज शेअर बाजाराच्या व्यवहाराला सुरूवात झाली, तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी वाढून 58,571.28 वर आलाय. NSE चा निफ्टी निर्देशांक 74.95 अंकांनी वधारत 17,463.10 वर खुला करण्यात आलाय. सकाळी 9.40 च्या सुमारास सेन्सेक्स 276 अंकांनी वाढून 58,627.21 वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 78 अंकांनी वाढून 17,466.45 वर व्यवहार करत होता.

मोठी बातमी! UPSC ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये; वेळापत्रक जाहीर

आज सकाळच्या सत्रात बाजार उघडल्यानंतर निफ्टी 50 मधील 38 कंपन्यांच्या शेअर किमतीत तेजी दिसून आली. तर, 12 कंपन्यांच्या शेअर किमतीत घसरण दिसून आली. बँक निफ्टीमध्येही खरेदीचा वेग दिसत आहे. बँक निफ्टी 150 अंकांनी वाढून 38,138 अंकांवर व्यवहार करत आहे.

निफ्टीमध्ये FMCG, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रियल्टी, ऑइल अँड गॅसच्या शेअर किमतीत तेजी दिसत आहे. आयटी शेअर निर्देशांकात मोठी उसळी पाहायला मिळाली. आयटी शेअर 1.69 टक्के वाढला. आरोग्यसेवा निर्देशांक 0.68 टक्क्यांनी वाढला. तर, ऑटो क्षेत्रात जवळपास 0.25 टक्के वाढ होत आहे.

‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्र अव्वल; देशभरातून यंदा २२ टक्के अधिक जीएसटी प्राप्त

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या शेअर किंमत वाढली आहे. यामध्ये इन्फोसिस (Infosys), टेक महिंद्रा (Tech Mahindra), टीसीएस (TCS), विप्रो (Wipro), बजाज फायनान्स (Bajaj Finance), एचएसीएल टेक (HACL Tech), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), डॉ. रेड्डीज (Dr. Reddy’s), इंडसइंड बँक (IndusInd Bank), एशियन पेंट्स (Asian Paints), एचडीएफसी (HDFC) बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

सोबतच आज टायटन (Titan), पॉवरग्रीड (Powergrid), एचयूएल (HUL), भारती एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), मारूती सुझुकी (Maruti Suzuki), एसबीआय आणि एनटीपीसीच्या (SBI and NTPC) शेअर दर घसरले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.