Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडन दौऱ्यावर; महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला लावणार हजेरी

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी, १९ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राणीचे पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Amazon चे शेअर्स वाढतीवर; गुंतवणूक कशी करावी?

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल झाले. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज IV मेमोरियल चॅपलमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी लंडनला जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 या कालावधीत भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी लंडनमध्ये असतील.

‘पोलीस भरती झालीच पाहिजे!’; उपमुख्यमंत्र्यांसमोरच तरुणांची जोरदार घोषणाबाजी

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ II च्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक विकसित आणि जवळचे झाले आहेत. जगभरातील लाखो लोकांसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राणी एलिझाबेथ यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले, त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.