Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर पंतप्रधान मोदींचा आवाज घुमणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरनंतर ते दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज चंद्रपूरला पोहोचले. चंद्रपूरमध्येही राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षबांधणीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार. मात्र या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार आहे.

चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी सुनील मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना खास भेट दिली आहे. ज्यामुळे आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे. मुनगंटीवार यांच्याकडून राज ठाकरेंना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करून दिलं आहे. त्यासोबत राष्ट्रध्वजाचा सन्मानचिन्ह देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेकॉर्ड केलेले भाषण या चिन्हात ऐकू येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या दिल्लीवारी; दौऱ्यामागील नेमकी कारणे गुलदस्त्यात

राज ठाकरे रविवारी नागपुरात दाखल झालेत. त्यांनी नागपुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निमंत्रण स्वीकारून फुटाळा तलावातील musical show ला हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेण्यासाठी पोहोचले. राज ठाकरे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषद घेऊन मनसेची नागपुरातील सर्व महत्त्वाची पदे बरखास्त करत असल्याची घोषणा केली.

घटस्थापनेदिवशी राज ठाकरे नागपुरात नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहेत. पक्षाच्या 16 वर्षानंतरही नागपुरात पक्ष वाढीसाठी काम झाले नसून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पदे रद्द केली जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. नागपूरनंतर राज ठाकरे दोन दिवस चंद्रपुरात असणार आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.