Take a fresh look at your lifestyle.

यंदा दिवाळीत तरुणाईला पंतप्रधान देणार विशेष गिफ्ट; रोजगार मेळाव्याद्वारे ७५,००० नोकऱ्या देण्यात येणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात सर्वात जास्त चर्चिले जाणारे हल्लीचे मुद्दे हे महागाई व बेरोजगारी आहे. विरोधी पक्ष नेहमी केंद्र सरकारला लक्ष्य करत रोजगार कुठे आहे? असे प्रश्न करत असतात. यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तरुणाईला मोठे गिफ्ट देणार असून या निमित्ताने पहिल्या टप्प्यात एकूण ७५,००० रोजगार देणार आहे. याकरिता एका विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून खुद्द पंतप्रधान या निमित्त्याने तरुणाईशी संवाद साधत या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करणार आहे.

गुगलचे ‘हे’ भन्नाट ॲप विशेष अलर्ट सुविधेसह सुसज्ज; पालकांची चिंता मिटणार

सविस्तर वृत्त असे की, वर्ष २०२३ पर्यंत देशात एकूण १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले असून यामध्ये पहिल्या टप्प्यातील एकूण ७५,००० हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इथे विशेष बाब म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५, ००० हजार तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने नियुक्तीपत्र देणार आहे.

भविष्यात ‘शिवसेना’ ही एकनाथ शिंदे यांची होणार – आशिष शेलार

लक्ष्मीपूजनाच्या नेमक्या एक दिवसापूर्वी म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ होणार असल्याने तसेच पंतप्रधान ऑनलाईनच्या माध्यमाने तरुणवर्गाशी संवाद साधणार असल्याने अनेकांना याबाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण होणार आहे. तसेच एवढया मोठ्या प्रमाणात रोजगार वाटप होत असल्याने यामुळे दिवाळीतच सरकार तरुणांना मोठे गिफ्ट देणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.