Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सार्वजनिक बँकचे लवकरच होणार खाजगीकरण; सरकारच्या निर्णायक हालचाली वाढल्या

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारत सरकार सध्या खाजगीकरणावर भर देत असून काही सरकारी वित्तीय संस्था तसेच बँकांमधील सरकारची हिस्सेदारी विक्रीस काढण्याचा सरकारचा मानस आहे. याअंतर्गत देशातील महत्वपूर्ण सरकारी बँक असलेल्या आयडीबीआय बँकेमधील सरकारची तसेच एलआयसीची संयुक्तपणे असणारी ६०. ७२ टक्के हिस्सेदारी विकण्यात येणार आहे. सुमारे ६४० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या या हिस्सेदारीसाठी बोली लावण्यात येणार असून, त्याचे मूल्यांकन करण्यासाठी शोध सुरु आहे. जर सरकारला या हिस्सेदारीची विक्री करण्यात यश प्राप्त झाले तर सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी विक्री ठरेल.

राज्य सरकारचं मोठं दिवाळी गिफ्ट; तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी होणार मेगाभरती

सध्या देशातील व विदेशातील बँकिंग, बिगर बँकिंग तसेच वित्तीय संस्थांनी या मालमत्ता खरेदीसाठी इच्छा दर्शवली आहे. पुढील महिन्यात या मालमत्ता विक्रीसाठी सुरक्षा मंजुरी तसेच नियामक मान्यता मिळण्याची शक्यता आहे. येत्या आर्थिक वर्षापर्यंत ही मालमत्ता विक्री केली जाणार असून यामुळे देशातील एका मोठ्या बँकेवरील सरकारचे हक्क संपुष्टात येईल. सध्या सरकारने महागड्या दरात आपली हिस्सेदारी विक्रीस काढली आहे.

अनिल देशमुखांची दिवाळी कारागृहातच; जामीन अर्ज फेटाळला

भारतीय आयुर्विमा महामंडळ व केंद्र सरकारने आयडीबीआय मधील आपली संयुक्त भागीदारी विक्री काढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकदा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण आयडीबीआय बँक फार जुनी वित्तीय सेवा देणारी सरकारी मालमत्ता असल्याने भविष्यात सरकारी बँक किती शिल्लक राहणार? अशी शंका देखील बळावत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.