Take a fresh look at your lifestyle.

बापरे! महागाईचा आगडोंब उसळला! आता ‘या’ महत्वाच्या वस्तूंचे भावही कडाडले

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मागील काही दिवसांपासून दररोजच्या वापरातील अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेल, साबण, मॅगी, कॉफी, मसाले, तांदूळ अशा अनेक खाण्या-पिण्याच्या आणि दररोज वापरायच्या गोष्टींचे दर वाढले असताना, आता डाळीचे दर वधारले आहेत. मागील जवळपास एका महिन्यात दाळीच्या दरात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? नसल्यात आता भरा इतका दंड…

डाळ, भाज्या, फळांसह खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा मोठा परिणाम होणार आहे. देशात पेट्रोल – डिझेल दर वाढल्याने या खाद्य सामग्रीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉटेल, रेस्टोरंट ओपन झाल्याने याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तूर डाळीच्या मोठ्या उत्पादकांपैकी एक आहेत. यंदा तूर डाळीचं उत्पादन 30 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काबूली चण्याचा भाव मागील महिन्यात 95 रुपये प्रति किलो होता, तो आता वाढून 110 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

चणे 5000 रुपये प्रति क्विंटल वरुन वाढून 5100 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकात तूर डाळ 6,400 ते 6,500 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे. हा दर आधी 6,300 रुपये प्रति क्विंटल होता.

केवळ डाळच नाही तर फळं आणि भाज्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत फळांच्या किंमती वाढल्या आहेत. उन्हाळ्यात फळांची मागणी वाढली असून आवक कमी आहे. त्यामुळे किमतीही वधारल्या आहेत.

साबण आणि डिटर्जेंटचे दर 3 ते 4 टक्क्यांनी वाढवले आहेत. हिंदुस्तान यूविलिव्हरने मागील 6 महिन्यात आपल्या वस्तूंच्या किमतीत 30 ते 40 टक्क्यांची वाढ केली आहे.

याशिवाय टूथपेस्ट, क्रीमसारख्या वस्तूही महाग झाल्या आहेत. खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये चहा, कॉफीसह दूध, मॅगी, तूप, ग्लूकोज पावडर, तांदूळ, गव्हाचं पीठ, मसाले, नमकीन अशा गोष्टींचे दर वाढले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.