Take a fresh look at your lifestyle.

आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल; केंद्राचा निर्णय

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी (R Venkataramani) यांची भारताचे नवीन अ‍ॅटर्नी जनरल (Attorney General) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांच्याकडून पदभार स्वीकारतील. ते या पदावर तीन वर्षांसाठी राहणार आहे.

‘ही’ IT कंपनी भारतात करणार 10 हजार जागांसाठी भरती

कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या कार्यालयाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आर वेंकटरामानी यांची अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद झाला आहे. या ट्विटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, ते 1 ऑक्टोबरपासून पदभार स्वीकारतील. सध्याचे अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल हे 91 वर्षांचे आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षांवर सुप्रिया सुळेंची भविष्यवाणी; म्हणाल्या…

याआधी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला सांगितले होते की, माझ्या वाढत्या वयामुळे भविष्यात ही जबाबदारी पार पाडणे मला शक्य होणार नाही. त्यानंतर केंद्र सरकारकडून आर.वेंकटरामानी यांची अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.