Take a fresh look at your lifestyle.

राहुरी तहसीलची 87 टक्के वसुली

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : राहुरी तालुक्याची महसूल वसुली मार्च २०२२ अखेर ८७ % इतकी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुक्याला यंदाच्या वर्षी १६ कोटी ६० लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते, मार्च अखेर १४ कोटी रुपयांची महसुल वसुली झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी वसुलीचे जादा उद्दिष्ट देऊनही तालुका महसूल यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात राहुरी महसूल विभागाने मार्च २०२१ अखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आव्हान महसूल विभागासमोर उभे राहिले होते. त्यापूर्वी राहुरी तालुका महसूल विभागाने २०१९-२० अखेर ११ कोटी रुपये अर्थात (१०० टक्के) व त्याही पेक्षा अधिक वसुली करण्यात आली होती. याकाळात राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख व त्यांचे सहकारी यांनी या कामी प्रयत्न केले होते. मार्च २०२० पासूनच्या काळात जागतिक कोरोना महामारीमुळे मोठे संकट राहुरीसह सर्वत्र दिसून आले. अनेक महिने लॉक डाऊन झाला. त्याचा परिणाम आर्थिक, कृषी व अन्य ठिकाणी दिसून आला. परिणामी महसूल वसुलीवर त्याचा मोठा परिणाम सर्वत्र दिसून आला. तसा राहुरीतही दिसला. ऑक्टोबर २०२० पासून विकासाची पुन्हा सुरुवात झाली.

राहुरी महसूल विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मागील वर्षात १२ कोटी रुपये महसूल उद्दिष्टे मार्च २०२१ अखेर दिले होते. यंदा २०२१ -२२ या वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयाने वसुलीचे उद्दिष्ट वाढवून १६ कोटी ६० लाख रुपये दिलेले आहे. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील वाळू साठयांचे लिलाव जाहीर करते . त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातील ९ वाळूसाठे लिलावापैकी महालगाव येथील प्रवरा नदीतील लिलाव झाला असून या लिलावातून महसूल विभागाला मोठा महसूल मिळणार आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गांच्या होत असलेल्या कामांच्या रॉयल्टीचा कोट्यवधी रुपयांचा महसूल राहुरी महसूल विभागाला प्रतीक्षेत आहे. याशिवाय जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातूनही बऱ्यापैकी महसूल वसुली अपेक्षित आहे. लिलावातून महसूल विभागाला मोठा महसूल मिळनार आहे. लिलावातील जाचक अटी व चोरटी वाळू वाहतूक आणि त्याला मिळणारे कथित महसूल, पोलीस व राजकीय अभय यामुळे महसूल वसुलीवर परिणाम होत महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.