Take a fresh look at your lifestyle.

Weather Alert!महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट; वाचा संपूर्ण आठवड्याचं हवामान एका क्लिकवर

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Weather Alert देशात मान्सूनने हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस कधी दाखल होणार अशी प्रतिक्षा आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कहर कायम आहे. राज्यात मान्सूनसाठी १० जूनची तारीख देण्यात आली आहे. यामुळे राज्यभर ढगाळ वातावरण आहे.

झटपट पर्सनल लोन हवं आहे का? मग या महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाच

राज्यात कुठे उष्णता तर कुठे मान्सूनचा इशारा
हवामान खात्याकडून मान्सूनबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मान्सून हा अरबी समुद्रात रेंगाळला असून महाराष्ट्रात मान्सून येण्यास विलंब होऊ शकतो, अशाही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. पण राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण झालं आहे.

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ मार्गावर दुसऱ्यांदा टोलवाढ; जाणून घ्या, कुठल्या नाक्यावर, किती वाढला टोल?

कोकणात कसं असेल हवामान?
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणात आजपासून पुढचे ४ दिवस ढगाळ वातावरण असेल. इतकंच नाहीतर घाटमाथ्यावर आणि अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह ९ तारखेपर्यंत उत्तर कोकणात पावसाचं वातावरण असणार आहे.

९ तारखेपर्यंत पावसाचा इशारा
दक्षिण कोकणमध्येही हवामान खात्याकडून ९ तारखेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला असून शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहिलं अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

अलर्ट! तुमचं सीमकार्डचं करू शकतं तुमचं बॅंक खातं रिकामं, जाणून घ्या सविस्तर

मुंबई IMD ने दिली माहिती…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि गोव्यातही ८ जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, ९ जून रोजी काही भागांतच ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पावसाचे
दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पावसाचे असले तर ८ आणि ९ जूनला वातावरण थोडं शांत असेल. शहरामध्ये ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.