Take a fresh look at your lifestyle.

आजपासून पावसाचा पुन्हा जोर वाढणार; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज, सोमवार ते 15 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण प्रदेश, पुणे-नाशिकसह पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली.

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मान्सूनच्या पावसाची तीव्रता आता प्रामुख्याने दक्षिणेकडे आहे. त्याचप्रमाणे सध्या ओडिशातून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात वाफ येत असल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, कर्नाटक किनारपट्टी भागातही पाऊस पडत आहे.

दंदे हॉस्पिटलच्या परिचारिकेला पंतप्रधानांचे पत्र; राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते प्रदान

पुण्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वर, सातारा, सांगली, जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. किनारी भागालाही सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा सहन करावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.