Take a fresh look at your lifestyle.

‘या’प्रकरणी राज कुंद्राचा मोठा दावा; सीबीआय चौकशीची मागणी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बहुचर्चित पॉर्न प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली होती. त्यानंतर आता जामीनावर सुटलेल्या राज कुंद्राने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मला फसवलं असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. याप्रकरणी राज कुंद्रा यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जदारांना झटका, EMI महागला; आरबीआयने केली रेपो दरात 50 BPS ने वाढ

मुंबई क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पोर्नोग्राफी प्रकरणात अडकवल्याचा दावा राज कुंद्राने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते नवे वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; मुख्यमंत्र्यांकडून बोनस गिफ्ट

कुंद्रा यांनी आपल्या तक्रारीत असा दावा केला आहे की, आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता. ज्याने मुंबईच्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याला पोर्नोग्राफी रॅकेटच्या कथित खोट्या प्रकरणात अटक केली होती. राज कुंद्रा यांनी आपल्यावर दाखल केलेल्या याच गुन्ह्याची पुन्हा सीबीआयने चौकशी करावी, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल अशी मागणी केली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.