Take a fresh look at your lifestyle.

नागपूर दौऱ्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून यावेळी स्थानिक पातळीवरील राजकारणाचे विश्लेषण ते करत असून पक्ष कार्यकर्त्याना विविध सूचना देखील देत आहे. आज नुकतीच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत पहिली बैठक घेतली यावेळी त्यांनी येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे यांनी चर्चा करताना विदर्भ व स्थानिक स्तरावर आपण अनेक दौरे करणार असून तुम्ही सुद्धा पक्षाच्या मोर्चेबांधणीला लागा असे आवाहन केले.

शिंदे गटाच्या रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; १०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप

पक्षामध्ये विविध बदल होणार असून पक्षाला मिळून ऊर्जा देण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे, मी पुन्हा विदर्भात येईल तोपर्यंत नीटपणे पक्षाची बांधणी करा अशा सूचना यावेळी राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केल्या. तुम्हाला स्थानिक पातळीवर पक्षाला मजबूत करायचे आहे, असे भावनिक आवाहन देखील बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी केले. सध्या मनसे एकला चालो रे या भूमिकेवर असून भाजपसोबत युतीच्या शक्यता सध्यातरी दिसत नाही आहे.

पेट्रोलबाबत दिलासा मिळण्याचा अंदाज; तब्बल १२ रुपयांपर्यंत दरांमध्ये घसरण होण्याचे संकेत

दरम्यान, शिवसेनेचे विभाजन झाल्याने भाजप शिवसेना युतीच्या सर्व शक्यता मावळल्याने येत्या काळात भाजपला नवीन मित्रपक्ष स्थानिक पातळीवरील निवडणुकांकरिता मताचे समीकरण जुळविण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी मनसे व भाजप युतीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्या अनेक पत्ते उलगडायचे आहे त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जेचा संचार घडवेल, हे प्राप्त परिस्थिती बघता दिसून येते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.