Take a fresh look at your lifestyle.

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची होणार सुटका; वाचा, नेमकी कुठल्या कारणासाठी झाली होती राजीव गांधींची हत्या?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेखाली ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या ए.जी. पेरारिवलन याला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. याच निमित्ताने राजीव गांधी यांची हत्या कशी झाली? हत्येचा कट कसा शिजला? याविषयी जाणून घेण्यासाठी ऑन धिस मीडियाची ही पोस्ट नक्की वाचा.

वाह ! शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना; जाणून घ्या भन्नाट फायदे

महत्वाच्या बाबी

१. देशाचे माजी पीएम राजीव गांधींच्या मारेकऱ्याला जामीन
२. ए.जी. पेरारिवलन याला सुप्रीम कोर्टानं केला जामीन मंजूर
३. राजीव गांधीच्या हत्येचा कट स्वतः प्रभाकरणने रजला होता
४. २१ मे १९९१ ला झाली माजी पीएम राजीव गांधींची हत्या

श्रीलंकेत सुरु होता भेदभाव
१८१५ साली ब्रिटिशांनी डचांकडून श्रीलंका घेतली. कारभार चालवण्यासाठी तेव्हां भारतातल्या तामिळनाडूतले तमिळ त्यांना उपयोगी ठरले कारण तमिळ लोकं इंग्रजी शिकलेले होते. लंका स्वतंत्र झाली तेव्हां लंकेतल्या सरकारी नोकऱ्यांतल्या ६० टक्के नोकऱ्यात तमिळ होते. लंका हा बहुसंख्य सिंहलींचा, बौद्ध धर्मियांचा देश. १९५६ साली लंकेनं सिंहली अधिकृत भाषा केली, त्या आधी तमिळ ही भाषा वापरात होती.. पाठोपाठ बौद्ध हा देशाचा अधिकृत धर्म केला. त्यानंतर हलके हलके सरकारी नोकऱ्यांत स्थानिक सिंहलींना प्राधान्य दिलं गेलं. हा भेदभाव नंतर वाढत गेला. हळूहळू तमिळ लोकांना बाजूला सारण्यात आलं. तमिळ खवळत गेले. या भेदभावामुळं अनेकदा दंगली उफाळल्या. तमिळी लोकांना बंदूक उचलणं हाच एकमेवर पर्याय वाटू लागला, असं तामिळांविषयी सहानुभूती असणारे बोलतात.

कॉस्मेटिक सर्जेरीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू, शरीराची विकृती दूर करणारी कॉस्मेटिक सर्जरी काय आहे? ही सर्जरी किती जोखमीची आहे?

प्रभाकरणने केले तमिळांचे नेतृत्व
तमिळ लोकांच नेतृत्त्व केलं ते ‘वेलुपिल्लई प्रभाकरण’. प्रभाकरन तेव्हां १८ वर्षाचा होता. प्रभाकरन तापट, एककल्ली आणि क्रूर होता. लोकशाही मार्गानं काहीही होणार नाही, हा विचार मनात ठेऊन त्याने ‘लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम’ ही संघटना चालू केली. १९८० च्या दशकात एलटीटीइचा तमिळनाडूमधलं सर्वात मजबूत, मोठं आणि अनुशासित आतंकवादी संघटन बनलं. हे जगातलं एकमेवर असं संघटन होतं ज्याच्याकडे वायू सैन्यही होतं. यानंतर श्रीलंकेत गृहयुद्धाची परिस्थीती निर्माण झाली. जुलै १९८३ ला श्रीलंकेच्या इतिहासात ‘काळा जुलै महिना म्हणलं जातं. २४ जुलै ते २९ जुलै १९८३ पर्यंत तिथं भरपूर दंगली झाल्या. ४ हजार तमिळ मारले गेले. हा हिंसाचार प्रतिकात्मक होता. २३ जुलै १९८३ ला एलटीटीइनं एक घातक हल्ला केला. यात श्रीलंकेचे जवान मारले गेले. यानंतर श्रीलंका सरकार विरुद्ध एलटीटीइचा असा संघर्ष पेटला.

कोणत्या गोष्टीचा हुंड्यात समावेश होतो? हुंडा घेतल्यास शिक्षेची तरतुद काय? पाहा कायदा काय सांगतो?

भारताचे शांतता प्रस्थापित करण्यासाठी केले प्रयत्न
भारतानं शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र, ते अयशस्वी ठरले. दरम्यानच्याच काळात इंदिरां गांधींची हत्या झाली. आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. मात्र, नियतीनं वेगळं वळण घेतलं. राजीव विरुद्ध प्रभाकरण अशी परिस्थीती पुढं निर्माण होणार होती. एलटीटीइला राजीव गांधींकडून मदतीची अपेक्षा होती. भारतानं सुरुवातीला यातून दुर राहण्याचा निर्णय घेतला. पुढं जानेवारी १९८७. जाफनात कर्फ्यू लागू होता. तिथल्या तमिळांचे हाल होत होते. श्रीलंकेचं सरकार काही ऐकत नव्हतं शेवटी भारतानं समुद्र मार्गानं जाफनामध्ये खाण्या पिण्याचं सामान आणि इतर महत्त्वपुर्ण गोष्टी पाठवल्या. यानंतर भारत आणि श्रीलंकेत चर्चा झाली. एलटीटीइला हत्यार सोडण्यासाठी भारत प्रयत्न करणार असल्याच ठरलं. एलटीटीइनं भारताची भावना समजत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानंतरही परिस्थीतीत बदलली नाही.

हत्यारांशिवाय पर्याय नसल्याचं जाणून एलटीटीइनं पुन्हा शस्त्र उचललं आणि भारतानं शांतीसेना पाठवली. तमिळाना प्रादेशिक स्वायत्तता द्यायला सिंहली राजी नव्हते आणि युद्ध थांबवायला टायगर राजी नव्हते. त्यामुळं भारतीय सेनेला दोघांचाही विरोध होता. शांती सेना लढाईच्या तयारीनं गेली नव्हती, शांती सेनेला लंकेचा भूगोल आणि सामरीक खाचाखोचा माहित नव्हत्या. शेवटी टायगर आणि शांती सेना यांच्यातच लढाई झाली. १९८९ ला देशात सत्तांतर झालं.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर करा

व्ही. पींनी भारतीय शांतीसेनेला श्रीलंकेतून माघारी बोलावलं. दरम्यान १९९० ला राजीव गांधींनी पुन्हा भारत- श्रीलंकेमध्ये झालेल्या कराराचा पक्ष घेतला. यामुळं भविष्यात राजीव गांधींकडे सत्ता आली तर भारतीय सैन्याच्या मदतीनं श्रीलंकेच सैन्य अधिक बलशाली होऊ शकतं, याचा अंदाज प्रभाकरणला होता. प्रभाकरनं राजीव गांधींवर दात धरला. राजीवनी आपल्याला दगा दिला, आपलं स्वप्न खलास करून आपल्याला प्रांतीक स्वायत्ततेच्या चिखलात ढकललं असं प्रभाकरनचं मत झालं.

त्यानं कट रचला. राजीव यांच्या हत्येचा कट स्वतः प्रभाकरण, त्याचा गुप्तहेर प्रमुख पोट्टू ओम्मान आणि महिला दलाची प्रमुख अकीला आणि सिवरासन यांनी रचला. ज्यात सिवरासन या मास्टरमाइंड होता. यानंतर १९ मेला सिवरासन याला राजीव गांधींच्या प्रचार दौऱ्याची खबर वर्तमान पत्रातून मिळाली. यानंतर २१ मे ला राजीव गांधी श्रीपेरंबदूरच्या दौऱ्याला येणार होते. तो दिवस निश्चित करण्यात आला. या सभेत धनु आणि सुबानं राजीव गांधींच्या जवळ पोहचून त्यांच्या गळ्यात माळ घातली. ज्यात बॉम्ब होता. क्षणात नियती फिरली. एक मोठा विस्फोट झाला आणि राजीव गांधीं मरण पावले.

काय सांगता! जगात असाही एक समुद्र आहे, ज्यात माणूस ठरवूनही बुडू शकत नाही; नेमकं कारण काय?

Comments are closed.