Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील ‘या’ बँकेवर आरबीआयने उगारला कारवाईचा बडगा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बँकांमध्ये केलेली गुंतवणूक (Investment) सुरक्षित व हमखास परतावा (Assured Returns) देतात याच विश्वासाने ठेवीदार आर्थिक व्यवहार करत असतात. परंतु आता पुण्यातील (Pune) एका सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या असून, बँकेवर न्यायालयाच्या आदेशानुसार आरबीआयने परवाना रद्द करण्याची कारवाई नुकतीच केली आहे. ‘रुपी सहकारी बँक’ (Rupee Co-Operative Bank) असे या बँकेचे नाव असून, कर्जबुडव्या ग्राहकांचा थेट फटका या बँकेला बसला आहे. अनेक वर्षांपासून कर्जदारांनी रुपी बँकेचे कर्ज थकविले होते ते वसूल होण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या, यामुळे आरबीआयच्या बँकिंग नियमानुसार बँक आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याने वर्ष २०१७ साली उच्च न्यायालयाने (High Court) बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

देशांतर्गत भाववाढ नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय; रवा, मैदा व पीठ निर्यातीवर सरकारची करडी नजर

दरम्यान, बँकेच्या विलीनीकरणासंबंधी प्रक्रिया (Merger Process) करता येईल का या विचाराने रुपी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती, सोबतच समिती नेमून उपाययोजना करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. रुपी बँकेचे ग्राहकांचे जाळे विस्तृत होते, राज्याबाहेर बँकेच्या अनेक शाखा होत्या. सध्या बँकेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी असून परवाना रद्द (License Cancellation) कारवाईमुळे त्यांना ठेवींचा परतावा कसा होणार? नेमका हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येत्या सहा आठवड्यात या बँकेचे सर्व व्यवहार बंद केले जाणार असून, दीर्घकाळ ठेवी परताव्यासाठी ग्राहकांनी दिलेला लढा व त्यांच्या अडकलेल्या ठेवी याचा नेमका काय निर्णय घेण्यात येईल? हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

पोस्ट ऑफिसची खास योजना; वाचा किती महिन्यात होतील पैसे दुप्पट?

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) याअगोदरच रुपी बँकेवर निर्बंध लावून आर्थिक व्यवहार थांबविले होते, परंतु आता परवाना रद्द कारवाईमुळे बँकेची संपत्ती, कर्मचारी व ठेवीदाऱ्यांच्या ठेवींचे भविष्य अंधारात असणार आहे. कुठल्याही बँकेचा परवाना रद्द होणे हे बँकेसमोर मोठे आव्हान निर्माण करणारी स्थिती असते, यामुळे सर्वात अधिक फटका ठेवींना बसतो कारण परतावा मिळण्यासाठी नेमका किती वेळ लागणार याची शाश्वती नसते. कर्जदारांच्या कर्जबुडव्या धोरणामुळे याअगोदर सुद्धा अनेक बँकांना कारवाईचा सामना करावा लागला आहे, यामुळे बँकेची पतधोरण क्षमता (Credit Policy Eligibility) व आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात येऊन बँक दिवाळखोरीत निघतात. नेमका हाच प्रकार रुपी बँकेसोबत घडला असून, ही ग्राहकांसाठी धक्का देणारी बातमी ठरली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.