RBI New Rules | तुमचं बॅंकेत खातं आहे? RBI ने बदलले नियम, वाचा बातमी

0

RBI New Rules : बॅंकाची बॅंक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.. तुम्हाला माहितीच असेल देशातील सर्व बॅंकाना चालविणारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.. रिझर्व्ह बँकेचे नियम देशातील सर्व बॅंकाना पाळाव्या लागतात. आरबीआय वेळोवेळी बॅंकांच्या नियमांत बदल करत असते.

 

आता पुन्हा आरबीआय बॅंकेने मोठा बदल केला आहे. आरबीआयने बॅंक खात्याशी संबंधित नियमांमध्ये विविध बदल केले आहे. काय बदल केले हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण आजकाल लहान पासून ते मोठ्यांपर्यंतचे बॅंकेमध्ये खातं आहे. कोणत्याही बॅंकेत खातं असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी आहे.

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) नवीन नियमानुसार, याआधीच आपली वैध कागदपत्रे सादर केलेल्या आणि पत्त्यात कोणताही बदल न झालेल्या खातेधारकांना आता KYC तपशील अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. RBI News

 

आरबीआयचे म्हणणं असं आहे की, KYC तपशीलामध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारकांना त्यांच्या ईमेल आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर सादर करता येईल. (Bank Saving Account Rules)

 

आरबीयने जारी केली मार्गदर्शक तत्वे

रिझर्व्ह बँकेकडून 6 जानेवारी रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली केली आहेत. ज्यामध्ये सांगण्यात आले की, ग्राहकांच्या KYC तपशीलामध्ये कोणताही बदल झालेला नसल्यास KYC प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे सेल्फ डिक्लेरेशन लेटर पुरेसे आहे.

RBI ने दिले बॅंकाना आवाहन

RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बँकांना त्यांच्या ग्राहकांना रजिस्टर्ड ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, एटीएम इत्यादीद्वारे सेल्फ डिक्लेरेशन करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारचे आरबीआयने बॅंकाना आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.