Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील ‘या’ सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; परवाना केला रद्द

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनानंतर आर्थिक बाबतीत मोठे बदल होताना दिसत आहे, ज्याचे कमी अधिक प्रमाणात प्रतिकूल परिणाम बघायला मिळत आहे. सातत्याने आर्थिक नियोजनात अपयश, अपुरे भांडवल तसेच आरबीआयच्या निकषानुसार कमाई करण्यास असमर्थता इत्यादी कारणांनी आतापर्यंत राज्यातील अनेक बँकांना टाळे लागले आहे. सध्यस्थितीत यामध्ये एका नव्या बँकेचा समावेश झाला असून पिंपरी स्थित बँकेचे मुख्यालय आहे. ‘द सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक’ म्हणून नाव असलेल्या बँकेला १० ऑक्टोबर पासून सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचे फर्मान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले होते, त्या अनुषंगाने बँकेचा व्यावसायिक परवाना देखील रद्द करण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वीच डाळी महागल्या; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता

या बँकेमध्ये कथित आर्थिक घोटाळा झाल्याची बातमी आहे त्यामुळे आरबीआयच्या पुढील आदेशापर्यंत बँकेला ठेवी स्वीकारण्यास तसेच ठेवीदारांना परतावा करण्यास पूर्णपणे मज्जाव घालण्यात आला आहे. देशाच्या प्रमुख बँकेने लावलेल्या कठोर निर्बंधामुळे या बँकेतील खातेदार तसेच ठेवीदारांची ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर चांगलीच फजिती झाली आहे. आरबीआय ने विविध गंभीर कारणे बघता सदरची परवाना रद्द करण्याची कारवाई सेवा विकास बँकेवर केली आहे.

अखेर शिंदे-ठाकरे गटाची नावं ठरली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लेखापरीक्षक आणि पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीतून ४२९ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करताना सेवा विकास बँकेने कमालीची अनियमितता केली असल्याचे आढळून आले. सध्या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून बँकेकडे अपुरे भांडवल आहे तसेच येत्या काळात कमाईची शक्यता नसल्याने बँकेचे कामकाज जर सुरु ठेवले तर भविष्यात ठेवीदारांच्या हिताला धोका संभवू शकतो म्हणून ही कारवाई केल्याचे आरबीआयने नमूद केले आहे. ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत त्यांच्या ठेवी परत मिळवून दिल्या जातील, असे आश्वासन आरबीआय ने दिले आहे. परंतु परवाना रद्द करण्याच्या निर्णयाने बँकेच्या ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, कारण बँकेच्या एकूण २५ शाखा विविध जागी आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

ऑन धिस टाईम मीडिया आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर आणि

इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ON THIS TIME (OTT) यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leave A Reply

Your email address will not be published.