Take a fresh look at your lifestyle.

आरबीआय लवकरच लाँच करणार ई-रुपया; फायदे धोक्यांबद्दल दिले स्पष्टीकरण

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारताची केंद्रस्थानी असलेली बँक आरबीआयने वित्तीय प्रणालीमध्ये बदल म्हणून ई-रुपया लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे स्पष्टीकरण आरबीआयने दिले असून काही ठराविक बाबींच्या वापरासाठी वित्तीय प्रणालीचा भाग म्हणून आरबीआय ई -रुपया लाँच करणार आहे. सध्या देशात ऑनलाईन आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येत असून, देशात दरदिवशी नवीन वापरकर्ते ऑनलाईन माध्यमाशी जुळत असल्याने वापरकर्त्यांची वाढ होताना दिसत आहे.

राज्य शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा; अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच शिक्षक भरती

आरबीआयद्वारे ई-रुपया प्रणालीबाबत कन्सेप्ट नोट जारी करण्यात आली असून नागरिकांना लवकरच याबाबतीत विस्तृत माहिती प्राप्त होणार आहे. सुरुवातीला सर्वसामान्य लोकांना याबाबतीत पूर्ण माहिती मिळणे तसेच याचा विस्तार होईपर्यंत ठराविक बाबी करिता ई-रुपया उपयोगात आणला जाणार असून हळूहळू याचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. डिजिटल चलन प्रणाली बाबत भारतासारख्या देशात लोक अद्यापही साशंक आहेत. त्यामुळेच भारतात क्रिप्टोकरन्सीचा तेवढ्या प्रमाणात प्रसार झाला नाही.

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; महामंडळाच्या वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक व सीएनजी बसगाड्या धावणार

आरबीआय जारी करत असलेल्या ई -रुपया प्रणालीवर कुठलेही व्याज मिळणार नसून याचे नगदी रोकड मध्ये रूपांतर करता येणार आहे. सायबर गुन्ह्यांचा सुळसुळाट झाल्याने या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी रिकॉल तसेच रिकव्हरी पर्याय देखील दिलेला असणार आहे. आरबीआयकडून अँटी मनी लौंड्रीन्ग नियमांचे पालन करण्यावर याप्रसंगी भर देण्यात येणार आहे. इथे महत्वाची बाब म्हणजे ई -रुपया प्रणाली युपीआय प्रणाली सोबत जोडण्यात येणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; पगारात होणार मोठी वाढ तर,…

संपूर्ण ५१ पानांचा ड्राफ्ट आरबीआयद्वारे या नव्या प्रणाली साठी तयार करण्यात आला असून लवकरच याबतीत अधिक माहिती सर्वसामान्यांना मिळू शकणार आहे. तूर्तास ही प्रणाली लागू होईपर्यंत वाट बघणे उचित ठरेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.