Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचा तपशीलवार तपशील देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये उपमहाव्यवस्थापक (वित्त) (Deputy General Manager (Finance)) आणि उप FA आणि CAO यांचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. ऑफलाइनद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पदवीधरांसाठी जॉबची सुवर्णसंधी! ‘या’ महापालिकेत 60,000 रुपये पगाराची नोकरी

डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून अकाउंट्स आणि फायनान्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान सात वर्षांचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवाराला कॉर्पोरेट ऑफिस बेलापूर, नवी मुंबई येथे काम करावे लागेल. या पदासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला १ लाख ५ हजार ५९२ रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; BSNL चे ‘अच्छे दिन’ येणार

डेप्युटी FA आणि CAO या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अकाउंट्स आणि फायनान्स पर्यंतचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतून पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान सात वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ७८ हजार ८०० रुपये वेतन दिले जाईल. या पदाच्या निवडीसह ४३ हजार ६५७ रुपये इतका भत्ता दिला जाणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.