Take a fresh look at your lifestyle.

Jio Plans: १ रुपयाही अतिरिक्त न देता मोफत घ्या Prime Video, Hotstar, Netflix चा आनंद; पाहा Jio चा भन्नाट प्लान

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Jio Plans: Reliance Jio ही सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे यूजर्ससाठी अनेक वेगवेगळे प्लान्स उपलब्ध आहे. कंपनीकडे प्रीपेड प्लान्सची एक मोठी लिस्ट तर उपलब्ध आहेच. सोबतच, स्वस्त पोस्टपेड प्लान्स देखील ऑफर करत आहे. जिओ आपल्या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे.

💥ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात महत्वाचे बदल, ‘हे’ आहेत नवीन नियम

Reliance Jio कडे ओटीटी बेनिफिट्ससह येणारे शानदार प्लान्स देखील उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये Amazon Prime Video, Disney+Hotstar, Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, तुम्हाला महिनाभर डेटाचा देखील फायदा मिळेल. Reliance Jio च्या अशाच स्वस्त पोस्टपेड प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.

😱‘या’ स्टार खेळाडूला टीम इंडियामधून कायमसाठी बाहेरचा रस्ता

Reliance Jio चा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ३९९ रुपयांचा स्वस्त पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय, या प्लानमध्ये यूजर्सला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. याशिवाय, तुम्हाला एसएमएस बेनिफिट्स देखील दिले जातात.

💥Samsung चे लाख रुपयांचे महागडे स्मार्टफोन खरेदी करा; फक्त ३०४२ रुपयांत मिळेल घरपोच सेवा

Reliance Jio च्या या पोस्टपेड प्लस प्लानमध्ये ७५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती १ जीबी डेटासाठी १० रुपये शुल्क लागते. यात २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरचा देखील फायदा मिळतो. यात कंपनी इंटरनॅशनल रोमिंगची देखील सुविधा देत आहे. तसेच, जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

जिओच्या ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये ओटीटी बेनिफिट्स देखील फायदा मिळेल. यात Amazon Prime Video, Disney+Hotstar आणि Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, कंपनीकडे ५९९ रुपये, ७९९ रुपये, ९९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे शानदार पोस्टपेड प्लान्स देखील उपलब्ध आहे. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह ओटीटी बेनिफिट्स देखील मिळेल. या प्लान्समध्ये देखील Amazon Prime Video, Disney+Hotstar आणि Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.