Take a fresh look at your lifestyle.

“उलटसुलट बोलालं तर याद राखा…!”; ‘या’ शिवसेना नेत्याने दिला नारायण राणेंना सज्जड दम

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना व शिंदे गट यांच्यातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढत असताना भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या वादात उडी घेत नुकतीच उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना गटनेत्यांच्या झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप व केंद्रीय नेतृत्वाला लक्ष केले होते. त्यानंतर राणे यांनी स्थानिक पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत टीका केली होती आता राणे यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढणार?; मुंबईस्थित कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झाले आहात. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध उलटसुलट बोललं तर याद राखा, तुमची शुगर आधीच वाढली आहे ती अजून वाढू देऊ नका. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की जास्त बोलू नका. मातोश्री व शिवसेनेच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झाले आहे, त्यामुळे कुणामुळे तुम्ही मोठे झाले आहे हे लक्षात ठेवा. यानंतर जर तुम्ही वाईट बोलले तर लक्षात ठेवा आम्ही शिवसैनिकच आहोत आम्ही सुद्धा काही बोलू.

दोन महिन्यांत राज्य खड्डेमुक्त होणार?; सचिवांनी दिले आश्वासन

पुढे बोलताना खैरे म्हणाले की, एखादा सरपंच व नगरसेवकाने बेकायदेशीर घर बांधले तर त्याच्यावर कारवाई केली जाते व त्याच सदस्यत्व देखील रद्द होते. परंतु राणे यांनी बेकायदेशीर बांधकाम केले असताना देखील त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई का करण्यात आली नाही ही कारवाई झाली पाहिजे असे खैरे म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.