Take a fresh look at your lifestyle.

आधार कार्ड नवीन व दुरुस्तीसाठी मोठा प्रतिसाद

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : राज्यमंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे जनसंपर्क कार्यालय, राहुरी तर्फे आयोजित” आपले सरकार आपल्या दारी” अंर्तगत आधार कार्ड नवीन व दुरुस्ती तसेच ई -श्रम कार्ड तयार करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, तमनर आखाडा (ता. राहुरी) येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आधारकार्ड नवीन व दुरुस्तीचे ५९ प्रकरणे करण्यात आली. तसेच ५७ नागरिकांचे ई श्रम कार्ड तयार करण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी भेट देऊन पाहणी केली व ०नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी पुन्हा एकदा येथे शिबीर आयोजित करण्याची मागणी केली.
तसेच ग्रामपंचायत कार्यालय सडे (ता. राहुरी) येथे नवीन आधारकार्ड व दुरुस्तीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७४ नागरिकांनी आधार कार्ड नवीन तसेच दुरुस्तीचा लाभ घेतला. तसेच ४२ नागरिकांचे ई श्रम कार्ड तयार करण्यात आले.

तसेच कणगर येथे आधार कार्ड नवीन व दुरुस्तीसाठी ४० नागरिकांनी लाभ घेतला. गावातच शिबीर आयोजित केत्यामुळे नागरिकांचा वेळ वाचला व सोय झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार मानले. शिबीर घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालयातील स्वीय सहाय्यक दतात्रय कदम, आधार केंद्र चालक दत्ता पेरणे, विकास कर्पे, नरेंद्र म्हसे व दिगंबर अडसुरे यांनी आधार कार्ड व ईश्रम कार्डसाठी लागणारी व्यवस्था केली. यासाठी वरिल गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले .

Leave A Reply

Your email address will not be published.