Take a fresh look at your lifestyle.

Corona – कोरोना वाढतोय! केंद्रच राज्यांना पत्र; महाराष्ट्रातही निर्बंध लागणार? आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -कोरोनाच्या सुरुवातीच्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य राहिली. नुकतेच राज्य सरकारतर्फे कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, चीनसारख्या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून तेथील नागरिक सध्या या कोरोना महामारीने त्रस्त आहेत. महत्वाचं म्हणजे, भारतात देखील कोरोना रुग्णसंख्या वाढीने जोर धरला असून देशात पुन्हा कोरोना (Corona) रुग्ण वाढू लागल्यानं महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राने अलर्ट दिला आहे.

दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असून पाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोरोना रोखण्यासाठी पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट दिला असून कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचसूत्री राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? मास्क सक्ती होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलंय. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केलं जात असून गरजेप्रमाणे पावलं उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे. घाई करण्याची कोणतीही गरज नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 137 रुग्ण आढळून आले. राज्यात सध्या 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक 390 रुग्ण मुंबईतले आहेत. तर ठाण्यात 49 सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.11 टक्के इतका झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.