Take a fresh look at your lifestyle.

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; १ ऑक्टोबरपासून ‘ही’ नवीन भाडेवाढ लागू

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (MMRTA) भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे. ऑटोच्या बेसिक भाड्यात २ रुपयांची भाडेवाढ झाली आहे. तर, टॅक्सीच्या भाड्यात देखील तीन रुपयांची भाडे वाढ झाली आहे.

नव्या दरानुसार रिक्षाला २३ रुपये मोजावे लागतील. आता टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागतील. तर कुल कॅबचे एसीचं प्रवासी भाडं ४० रुपये होणार आहे. ही नवीन भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

शुक्रवारी रिक्षा, टॅक्सीचालकांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीत भाडेवाडी संदर्भात सरकारकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना हिरवा कंदील मिळाला आहे. या बैठकीत रिक्षा, टॅ्सी चालकांनी भाडे वाढीचा प्रस्ताव मांडला होता. सीएनजी दरवाढीमुळे महागाईच्या झळा बसत असल्याने भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.

मात्र, शिंदे सरकारने टॅक्सी चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय दिला आहे. मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मार्च महिन्यातच रिक्षाच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावेळी रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपयांवर गेले. त्यानंतर पुन्हा एकदा भाडे वाढले आहे. या भाडेवाढीचा फटका सर्वांनाच बसणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.