Take a fresh look at your lifestyle.

रितेश-जेनेलियाच्या अडचणीत वाढ? ‘या’ कर्जावरून नवा वाद सुरू

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लातुर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर MIDC प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

…तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करणार; भुजबळांनी दिला अल्टिमेटम

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे. हा कारखाना सुरु होण्याआधीच तो वादात सापडला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या में.देश ऍग्रो प्रा.लि. कंपनीला लातूर MIDC ने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला? असा सवालच मगे यांनी उपस्थित केला आहे.

MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. जाहीर पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.