Take a fresh look at your lifestyle.

जर भारताने रशियाची कच्च्या तेलसंदर्भातील इंधनाची मोठी ऑफर स्वीकारली तर अमेरिका काय करणार?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – गेल्या बऱ्याच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटले. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवलक, त्यांनतर युक्रेनने देखील लढण्याचा निर्णय घेतला. रशिया सारख्या बलाढ्य देशाला युक्रेनच्या सैनिकांनी आतापर्यंत खूप चांगली झुंज दिली आहे. दरम्यान, रशियाचा युक्रेनसोबत युद्धाचा निर्णय न पटल्याने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले. या निर्बंधात रशियाच्या तेलापासून वायूवरही बंदी घालण्यात आली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

पाश्चात्य देशांकडून घालण्यात लादण्यात आलेल्या निर्बंधांना न जुमानता रशियाने हे युद्ध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. रशियाने आपली अर्थव्यवस्था टिकून राहावी यासाठी भारतासमोर एक उत्तम प्रस्ताव ठेवला. ज्यात रशियातर्फे भारताला कमी किमतीत इंधन तेल पुरवठा केला जाईल अशी ऑफर देण्यात आली. शिवाय, रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत भारताची तटस्थ भूमिका समजून घेतली आहे.

शेअर मार्केटचा नाद जीवावर बेतला, दोघांच्या आत्महत्येचा असा झाला उलगडा!

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आम्ही जे निर्बंध लादले आहेत त्यांचे पालन करा असा संदेश इतर देशांना प्रसार माध्यमांद्वारे देण्यात आला. यावेळी, रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत, याबाबत अमेरिका भारताला काय संदेश देऊ इच्छित आहे? असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता.

विशेष बाब म्हणजे भारताने रशियाकडून तेल विकत घेतले तर भारताला देखील अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल, अशी भीती भारताने व्यक्त केली होती, मात्र, आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रस्तावाच्या बाबीवर भूमिका मांडताना अमेरिकेच्या खासदारांनी म्हटले आहे की, भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीत रशियाबद्दलची त्यांची भूमिका समजण्यासारखी आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; राज्यसरकारचा ‘हा’ प्रस्ताव राज्यपालांनी स्पष्ट नाकारला!

युक्रेन सध्या संकटात आहे. मात्र, या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं हे रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांचं उल्लंघन मानण्यात येणार नाही असं अमेरिकेनं स्पष्ट म्हटलं आहे. याशिवाय, अमेरिकेने भारताला एक सल्लाही दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.