Take a fresh look at your lifestyle.

रशियन सैनिकांचा विद्रोह, आपल्याच कर्नलला टॅंकखाली चिरडून मारलं!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

कीव – रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला (Russia-Ukraine War) आता एक महिना झाला आहे. या युद्धात दोन्ही देशांतल्या हजारो सैनिकांसह निष्पाप युक्रेन नागरिकांचाही (ukraine citizen death) मृत्यू झाला आहे. रशियाने केलेल्या आक्रमणाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी युक्रेनमधील सामान्य नागरिकही युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता हळूहळू रशियन सैनिकांचं मनोधैर्य (Russian Troops) खचू लागलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

गेल्या अनेक दिवसांपासून रशियन सैनिक (Russian solider) युक्रेनमध्ये ठाण मांडून आहे. मात्र आता त्यांना घरी जायचं आहे. मात्र असं असलं तरीही युद्ध संपल्याशिवाय घरी येऊ नका असे आदेश रशियन सैनिकांना आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाराज झालेल्या रशियन सैनिकांनी आपल्याच एका सीनिअर ऑफिसरवर राग व्यक्ती केला आहे.

हेही वाचा – …म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढताहेत; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

एका मीडिया रिपोर्टनुसार, रशियन कर्नलला त्यांच्याच सैनिकांनी टॅंकखाली (Tank) चिरडून मारलं. हे कर्नल यूक्रेन युद्धात रशियन सैनिकांच्या एका युनिटचं नेतृत्व करत होते. ‘द सन’च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं, की काही रशियन सैनिकांचं या युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे आता त्यांनी मायदेशी परतण्यासाठी तगादा लावला आहे. त्यातच नाराज झालेल्या सैन्याच्या एका तुकडीने 37व्या मोटर रायफल ब्रिगेडचे कमांडर युरी मेद्वेदेव (Yuri Medvedev) यांच्यावर रणगाडा चढवला.

हेही वाचा – आता फ्री मध्ये पहा आयपीएल 2022 चं live streaming तुमच्या मोबाईलमध्ये, जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. या फोटोमध्ये कर्नल मेद्वेदेव यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयाच नेलं जात असल्याचं दिसतं. सैनिकांनी या कर्नलच्या पायावर रणगाडा चढवला होता; मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले होते, असं म्हटलं जात आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – 12 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, भारत पोस्टल विभागात भरती सुरू

या घटनेवरून असं दिसून येत आहे की, रशियन सैन्य आता युद्ध परिस्थितीला कंटाळलं आहे. त्यातच बरेच सैनिक मारले गेल्याने सैनिकांमध्ये नाराजी परसली आहे. येत्या काही दिवसांत अशा आणखी घटना पाहायला मिळू शकतात. कारण रशियन सैनिक लढून थकले आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी परतायचं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.