Take a fresh look at your lifestyle.

एसटी महामंडळाच्या ६० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सह्याद्री मल्टीसिटी फायनान्सतर्फे सन्मान

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – दिनांक ३१ मे, २०२२ रोजी सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स लिमिटेड तर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ६० सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. आपल्या कार्यकाळात सुमारे ३० ते ३५ वर्षांची प्रामाणिकपणे सेवापूर्ती करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासन, एसटी बँक तसेच सह्याद्री फायनान्स लिमिटेड तर्फे एसटी आगारात जाऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीतेसाहेब, आगार व्यवस्थापक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या सन्मान सोहळ्यात मोरे पंडित सदाशिव, पठाण साजिदखान हसनखान, मोकाशी आनंदराव दत्तात्रय, अदिक हंसराज सारंगधर, खाडे अर्जुन रावसाहेब, दरेकर नवनाथ किसन, दहिफळे बाबासाहेब आश्रुबा, काळे बाबुराव रतन, फडके नामदेव ज्ञानदेव, बोठे सूर्यकांत विठ्ठल, गवळी प्रकाश रामभाऊ, चितळे बाबासाहेब हिराजी, आरणे प्रकाश रामचंद्र, सुंबे शंकर ममताजी, दिवटे गोरक्षनाथ सखाराम, बडे निवृत्ती किसन, धोदमल अशोक भिकाजी, तांबोळी सुभान मोहम्मदभाई, सरोदे राजेंद्र बाबुराव, कऱ्हाड बाजीराव उत्तम, नेमाने हरिश्‍चंद्र मुरलीधर, आढाव अशोक अंबादास, वायदंडे तानाजी किशोर, लोंढे बाळासाहेब ठमाजी, सकट बापू गणा, गायकवाड वसंत उत्‍तम, शिंदे बाळू महादू, गायकवाड बापू सर्जेराव, जाधव विठ्ठल सोनबा, आव्हाड नवनाथ पंढरीनाथ, आव्हाड अर्जुन विश्वनाथ, नारायणे कैलास शिवाजी, जावळे ज्ञानदेव तुकाराम, बांगर नवनाथ अश्रुबा, बेळगे सुरेश कोंडीराम, कारखेले अर्जुन शहाराम, घुले वसंत दशरथ, पालवे श्रीधर म्हातारदेव, नागरे दिलीप बाबुराव, कदम ज्ञानेश्वर बुधाजी, देशपांडे संजय गोविंद, बोधे प्रमोद पांडुरंग, आंधळे भिमराज तुकाराम, अडसूळ दिगंबर तेजमल, भालसिंग गोरख केरू, बोरुडे सुधाकर किसन, दाते गणपत शंकर, जावळे पेमराज वामन, जवणे सोपानराव भगवानराव, कदम सिताराम चंद्रभान, मोरे बापू तुकाराम, मांडगे तात्याबा जयसिंग, पुंड शिवदास संभाजी, पिंपळे दौलती विनायक, साठे बाळू धर्माजी, ठोकळ अशोक बाळाजी, तुरे गणेश रामचंद्र, झेंडे बाळासाहेब श्रीपत, आरु प्रमोद बबन, पवार बाबासाहेब गोविंद आदि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ तसेच ‘पॉझिटिव्ह व्हा’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

तुमच्या जिल्ह्याचे असेच सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

प्रसंगी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत या सन्मान सोहळ्यामुळे पुढील वाटचालीसाठी एक नवीन ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स लिमिटेडचे चे जनरल मॅनेजर मामासाहेब भालसिंग आणि सर्व शाखांचे मॅनेजर आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.