Take a fresh look at your lifestyle.

साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेस लोणावळा येथे संपन्न झालेल्या पतसंस्था सहकार परिषद या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा मानाचा बँको ब्लू रिबन पुरस्कार २०२१ चे वितरण कॉसमॉस बँकेचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद कोकरे, अशोक नाईक व बँकोचे मुख्य संपादक अविनाश शित्रे गुंडाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रात संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागांमध्ये बँको ब्लू रिबन पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटची निवड करण्यात आली. यावेळी कॉसमॉस बँकेचे व्हा.चेअरमन कोकरे म्हणाले समाजासाठी झटून काम करताना आर्थिक संस्थांनी अर्थकारणही जपले पाहिजे. सर्वांचे हित जोपासणाऱ्या संस्था आपला एक वेगळा ठसा निर्माण करत इतरांना आदर्शवत व्हावे असे काम करून दाखवल्यानेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी गेल्या नऊ वर्षापासून आम्ही अविरतपणे झटत आहोत. ठेवीदारांचा विश्वास जिंकत आम्ही यशस्वी ठरलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामध्ये संचालक मंडळ, कर्मचारी व कलेक्शन एजंट यांचेही सहकार्य लाभले आहे. सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे. त्यास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे ही संस्था आणखी झपाट्याने प्रगती करेल असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी संचालक विष्णू गीते, किशोर थोरात, बाळासाहेब तांबे, विलास पाटील, डॉ.कृष्णात चन्ने, मॅनेजर सचिन खडके उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.