Take a fresh look at your lifestyle.

वादग्रस्त विधान प्रकरणी समाजवादी पक्षनेते आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य तसेच उत्तर प्रदेशातील या पक्षाचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे आझम खान यांना रामपूर न्यायालयाने दणका दिला आहे. वर्ष २०१९ साली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आझम खान यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याशिवाय अन्य काही आरोपही ठेवण्यात आले होते, सदर प्रकरणी आझम खान हे दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

मनसे व ठाकरे गटात शाब्दिक खडाजंगी; बेडूक व सरडा प्राण्यांची उपमा देत साधले परस्पर शरसंधान

न्यायालयाने सुनावलेल्या या निर्णयाने आझम खान यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले जाण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणी २५ हजारांचा दंड देखील न्यायालयाकडून आझम खान यांना ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे जर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यास हा समाजवादी पक्षाकरिता मोठा आघात ठरणार असल्याचे समजते.

असदुद्दीन ओवैसीला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर; हिजाब मुद्द्यावरून घेरले

आजवर रामपूर मतदारसंघातून आझम खान १० वेळा निवडून आले आहे, तसेच त्यांचे प्रस्थ राज्यात मोठे आहे. येत्या काळात आझम खान यांच्या आमदारकीबाबत काय निर्णय निर्णय घेण्यात येतो हे लवकरच कळेल परंतू कोर्टाचा सध्याचा निर्णय नक्कीच उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.