Take a fresh look at your lifestyle.

सोमय्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच संजय राऊतांनी फोडला नवा बॉम्ब; शेकडो कोटींचा ‘हा’ घोटाळा बाहेर काढणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच खळबळजनक घडामोडी घडत असल्याचं सध्या चित्र आहे. एकीकडे, किरीट सोमय्या नेहमीच सध्या महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राहतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते किरीट सोमय्यांविरुद्ध बोलतांना दिसतात. दरम्यान, आज दुपारी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहेत, अशी माहिती हाती लागली होती.

आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त ओटीटी प्लान लाँच , आता फक्त ४९ रुपयात ३० दिवस घ्या मोफत चित्रपट-सीरिजचा आनंद

सध्या सर्वांच्या नजर आज किरीट सोमय्या राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद याकडे लागल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच संजय राऊत यांनी एक मोठा आरोपांचा बॉम्ब फोडला आहे. किरीट सोमय्यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या

संजय राऊत म्हणाले, पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे उघडकीस आणू लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो गुन्हेगार आहे. दाऊद इब्राहिमने जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर ज्यांनी घोटाळा केला आहे, लोकभावनेशी खेळले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झाले आहेत अशांनी दुसऱ्यांच्या संदर्भात खोटे आरोप करणं बरोबर नाही. लोकं विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला? विक्रांतचा पैसा गोळा गेला त्याचं काय झालं?

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

लवकरच या महाशयांचा मी एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर मनपा आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा झालाय. कुठे कुठे पैसे खातायत तर विक्रांत पासून ते टॉयलेट पर्यंत. ही सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एनजीओ ही लोकं चालवत होती त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे सर्व घोटाळे… हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा असंही संजय राऊत म्हणाले.

या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. सर्व भाजपच्या नेत्यांची राष्ट्रीय भक्ती ओसंडून वाहत असते. काल सुद्धा मी पाहिलं त्यांनी पवार साहेबांबत ट्विट केले. एखादं ट्विट त्यानी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर करावं. आम्ही आता बाहेर काढणार आहोत तो टॉयलेट घोटाळा त्याबाबतही एखादं ट्विट फडणवीसांनी करावं असंही संजय राऊत म्हणाले.

मान्सूनबाबत गोड बातमी! कसा असेल यंदाचा पाऊस वाचाच

Leave A Reply

Your email address will not be published.