Take a fresh look at your lifestyle.

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? संजय राऊतांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर – राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेना यांच्या भविष्यातील युती संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविरामही दिला. भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येत नाही, ज्या पद्धतीनं 25 वर्ष आम्ही भाजपसोबत एकत्र राहून काम केलं, ते विसरून भाजप सूडानं वागतंय, त्यामुळे आमचं एकत्र येणं अशक्य आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – एसटी संपाबाबत मोठी बातमी, कोर्टाने राज्य सरकारला दिले ‘हे’ निर्देश!

‘भगव्याचा दांडा फक्त आमचाच’

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर टीका देखील केली आहे. “भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही”, असा चिमटाही राऊत यांनी भाजपला काढला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – खुशखबर! CISF मध्ये 249 रिक्त जागांसाठी भरती, तब्बल 81 हजारपर्यंत मिळेल पगार

‘MIM भाजपची बी टीम’

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, एमआयएम ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. हे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीमधून दिसूनच आलं आहे. एमआयएममुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं. तिथली मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं, असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा – हवामान विभागाकडून अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचे

‘आघाडीने एकत्र लढावं’

किमान समान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनले आहे. कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केला नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसं झाले नाही. तर आम्ही स्वबळावर लढू, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.