Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? शिवसेनेचा सवाल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. दिवसेंदिवस राज्य सरकार आणि भाजपा असा संघर्ष सुरू आहे. याच मुद्द्यावरून बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का? हे बघावे लागेल, असा टोमणा संजय राऊत यांनी फडणवीसांना मारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या घरात पेनड्राईव्ह रोज बाळंत होतात का? हे बघावे लागेल. विरोधक रोज खोटे प्रकरण तयार करतात. यांना हे बाळंतपण कसे जमते, त्यांचे ठाऊक. तसेच यांनी पेनड्राईव्हची फॅक्ट्री काढली आहे का? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय चौकशी समिती आणि विरोधी पक्षनेत्यांची मिलीभगत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना अडचणीत आणत आहेत, काही दिवसांनी ते तामिळनाडूत जातील. तुमच्या शंभर पेनड्राईव्हवर आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडेल, असा गंभीर इशाराच राऊत यांनी यावेळी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणा आणि विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी, मिलीभगत सुरू आहे. एकंदरीत यावरून असे दिसून येते की, यांना महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही आहे, हे सरकार त्यांना उध्वस्त करायचे आहे. विरोधक फक्त तुरुंगात टाकण्याच्या बाता करतात. नेमके आमच्यावर कोणते आरोप आहेत, हे माहीत नाही.

राज्यातील २५ लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी आम्हाला तुरुंगात टाका मगच आरोप करा. तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे तो आधी शांत करा.” असे संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.