Take a fresh look at your lifestyle.

सीमा प्रकरणी समितीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; पंतप्रधानांसोबतची चर्चा उघड करण्याची मागणी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील काही प्रमुख नेत्यांच्या तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत काल मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावर चर्चा करत तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काही महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला, यावेळी सदर मुद्दा निकालात काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समितीचे म्हणणे पंतप्रधानांच्या समोर मांडण्याकरिता एका शिष्टमंडळाच्या निर्मिती करण्यावर एकमत झाले. सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली. लवकरच या समितीचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीला जाणार आहे व महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद सोडण्यावर लक्ष पुरविण्याची विनंती पंतप्रधानांना करणार आहे.

कतार देशाने फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाकरिता केला बक्कळ खर्च; आकडा ऐकल्यानंतर डोके चक्रावणार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सीमाप्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्णयावर आपले मत मांडताना म्हटले की, महाराष्ट्रातून शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जाईल तेव्हा पंतप्रधानांसोबत काय चर्चा होणार आहे हे उघड करण्यात यावे. प्रसंगी या चर्चेचा व्हिडीओ बनवून तो जनतेसमोर आणला जावा अशी मागणी देखील यावेळी राऊतांनी केली. आजवर राज्य सरकारमधील किती मंत्री बेळगावला गेले, असा प्रश्न देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा जोर वाढणार; किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज

आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य करताना राऊतांनी अप्रत्यक्षपणे राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत म्हटले, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सरकार वाचवत आहे, तर मग असे सरकार सीमावासीयांना न्याय देऊ शकेल का? असा प्रश्नवजा टोलाच राऊतांनी सरकारला लगावला आहे. एकंदरतीच सर्वपक्षीय सदस्यांनी मिळून बनलेल्या राज्याच्या महत्वपूर्ण मुद्द्याला मांडणाऱ्या समितीवर संजय राऊतांनी केलेले विधान त्यांना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी तर बनवणार नाही ना? हे लवकरच कळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.