Take a fresh look at your lifestyle.

एसबीआयनं ‘या’ कारणामुळे अनेक बँक खाती केली बंद; ग्राहकांना बसलाय धक्का

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बँक खातं (Bank Account) असलेल्या प्रत्येकाला वेळोवेळी केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे. असं करण्यात अयशस्वी झाल्यास बँकिंग व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) याच कारणावरून अनेक ग्राहकांची खाती बंद (Account Close) केली आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा झटका (Customers Shock) बसला आहे. बँकेनं अनेक खाती बंद केल्यानं ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. बँकेनं किमान पूर्वसूचना द्यायला हवी होती, असे मतंही ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे केवायसी अपडेट (KYC Update) केल्यानंतर खात्यातून व्यवहार सुरू होतील, असे बँकेने स्पष्ट केले.

सोन्याची झळाळी उतरली; तिसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

केवायसी अपडेट (KYC Update) न केल्यामुळे एसबीआयने ग्राहकांची खाती गोठवली (फ्रीज) आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. याबाबत ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. “माझ्या पैशांच्या हस्तांतरणावर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण केवायसीचे (KYC) पालन न करणे हे आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेने किमान फोन किंवा मेलद्वारे कळवले पाहिजे. पण, एसबीआयने थेट खातंच बंद केलं आहे. (SBI closed the account directly) मी एक एनआरआय आहे, केवायसी अपडेट करण्यासाठी कृपया मला मदत करा.” हे ट्विट एका ग्राहकाने केले आहे. इतर काही ग्राहकांनीही अशाच तक्रारी ट्विट केल्या आहेत.

Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं?

एसबीआयचं स्पष्टीकरण

ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अद्यतनांबद्दल माहिती दिली जाते. खाती अचानक बंद करण्यात आली नाही. तुम्ही जवळच्या SBI शाखेला भेट देऊन KYC अपडेट करू शकता, त्यानंतर तुमच्या खात्यातील व्यवहार सुरू होतील, असं म्हणत आरबीआयच्या (Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकांना वेळोवेळी केवायसी करणे आवश्यक आहे. या ग्राहकांना अनेक माध्यमातून माहिती दिली जाते. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसही पाठवला जातो, असे एसबीआयनं सांगितलंय. (SMS is also sent to the customer’s registered mobile number)

टीम इंडियाची मोठी चूक; आजच्या विजयात उद्याच्या पराभवाची बिजे?

जाणून घ्या केवायसी अपडेट प्रक्रिया

एसबीआय आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही केवायसी अपडेट (Online-Offline KYC Update) करण्याची परवानगी देते. ऑफलाइन अपडेट करण्यासाठी ग्राहकांना जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्रे जमा करावी लागतात. ऑनलाइन अपडेट करताना, ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत बँक शाखेच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवावी लागते. बँक ही कागदपत्रे तपासते आणि केवायसी अपडेट करते. केवायसी ऑनलाइन अपडेट (KYC online update) करण्यासाठी, तुम्हाला त्याच कागदपत्रांची एक प्रत पाठवावी लागेल जी तुम्ही यापूर्वी बँकेत (Bank) जमा केली होती. कागदपत्रांमध्ये काही बदल असल्यास, बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी अपडेट केले जाऊ शकते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.