Take a fresh look at your lifestyle.

शिष्यवृत्तीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण : डॉ. रसाळ

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी व शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते. फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे (पाईप्स) सी.एस.आर. भागीदार मुकुल माधव फाउंडेशनचा हा शिष्यवृत्तीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि संशोधनाचे स्वप्न पूर्ण होत आहे असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे (पाईप्स), सी.एस.आर. भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी महाविद्यालय आणि अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव या विद्यार्थ्यांना कै. सौ. मोहिनी प्रल्हाद छाब्रीया शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. रसाळ हे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, फिनोलेक्सचे विभागीय विपणन व्यवस्थापक योगेश राऊत व तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रिज लि., पुणे यांच्यात सन 2019 ला शिष्यवृत्तीसाठी सामाजंस्य करार झाला होता. या अनुषंगाने मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने कृषी पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवीसाठी रु. 50 हजार प्रतिविद्यार्थी प्रतिवर्ष याप्रमाणे शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. दरवर्षी कृषि महाविद्यालय, पुणे, कोल्हापूर, धुळे, कराड, नंदुरबार, मुक्ताईनगर, हळगाव, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय या महाविद्यालयांच्या 59 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या वर्षाची शिष्यवृत्ती मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी त्या त्या महाविद्यालयात समक्ष जावून दिली आहे. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी व अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगावचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.