Take a fresh look at your lifestyle.

शालेय परीक्षाच केल्या रद्द; ‘या’ देशाने घेतला धक्कादायक निर्णय

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

कोलंबो : श्रीलंका १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीलंकेत अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोलंबोमध्ये प्रिंटिंग पेपर संपुष्टात आल्याने आणि नवीन पेपरच्या आयातीसाठी निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

पेपरच्या तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या

एका वृत्तानुसार अधिकृत सूत्रांनी सांगितले की या निर्णयामुळे देशातील ४५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या परीक्षेला फटका बसणार आहे. याबात शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियोजित चाचणी परीक्षा पेपरच्या तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. “शाळेतील मुख्याध्यापक मुलांची चाचणी परीक्षा घेऊ शकत नाहीत, कारण प्रिंटिंगसाठी लागणारा कागद आणि शाई आयात करण्यासाठी निधी नाही,” असं पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले.

हेही वाचा  सोन्याची झळाळी उतरली, नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण!

श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर

श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. अत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अन्न, इंधन आणि औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा ७०% ने घसरून डॉलर २.३६ अब्ज झाला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून अन्न, औषध आणि इंधन यासह सर्व आवश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे.

हेही वाचा  ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रातील ‘या’ गावात निघते जिवंत माणसाची प्रेतयात्रा!

Leave A Reply

Your email address will not be published.