Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! स्कूल बसमध्ये दारू पिऊन विद्यार्थीनींचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

चेन्नई : भरधाव वेगात असलेल्या बसमध्ये शालेय विद्यार्थीनी दारू पिऊन धिंगाणा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळकरी मुली शाळेच्या गणवेशात चक्क बिअर पिताना दिसत आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या व्हिडिओमध्ये शालेय विद्यार्थीनी चालत्या बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केला असून या घटनेला दुजोराही दिला आहे. ही काही खोटी घटना नाही, असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

हेही वाचा – मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा; थेट मुंबई पोलिसांची कॉलर पकडली, व्हिडिओ व्हायरल

सदरील घटना ही मंगळवारी (22 मार्च) रोजी घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. थिरुकाझुकुंद्रम ते ठाचूर असा प्रवास करत असताना मंगळवारी ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, शाळा सुटल्यानंतर जेव्हा विद्यार्थी घरी जात होते तेव्हा वाटेत चालत्या बसमधील मुला-मुलींच्या एका गटाने बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि पिण्यास सुरुवात केली. चेंगलपट्टू जिल्हा शिक्षण अधिकारी रोज निर्मला यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, कसा असेल यंदाचा पाऊस? हवामान विभागानं वर्तवला अंदाज

“ही घटना शाळेबाहेर घडली असल्याने पोलीस त्याचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांचा तपास संपल्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर विद्यार्थी व विद्यार्थिनींवर योग्य ती कारवाई करू.”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.