Take a fresh look at your lifestyle.

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ मार्गावर दुसऱ्यांदा टोलवाढ; जाणून घ्या, कुठल्या नाक्यावर, किती वाढला टोल? how to recharge fastag

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे Fastag पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये २०२२ या वर्षात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. चाळकवाडी टोलकानाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल २५ रुपयांनी वाढ केली असून, सोमवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. चाळकवाडी टोलनाका २०१७ मध्ये बंद पाडण्यात आला होता.how to recharge fastag

अबब! १.३ कोटी रुपयांना विकली ‘ही’ नोट; या नोटेत इतकं काय खास

तो गेल्या आर्थिक वर्षांत पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात चाळकवाडी आणि हिवरगाव येथील टोलनाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये एक एप्रिल २०२२ रोजी पाच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ५० रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी ८० रुपये टोल आकारला जात होता.

500 रुपयांच्या नोटबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या माहिती अन्यथा बसेल लाखोचा फटका

आता दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल २५ रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार व हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी ७५ आणि दुहेरी प्रवासासाठी ११० रुपये टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, Commercial vehicle मिनी बससाठी एकेरीचा टोल ११५ रुपये करण्यात आला आहे. bob fastag

तर, ट्रक व बसचा एकेरी वाहतुकीचा टोल २७० राहणार आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कार आणि हलक्या खासगी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी ९० रुपये टोल होता. तो आता १०० रुपये करण्यात आला आहे. दुहेरी प्रवासाठी १४० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी १६५ रुपये, बस आणि ट्रकसाठी ३४५ रुपये टोल द्यावा लागेल. ही टोलवाढ सोमवारपासून लागू होणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

मोदी सरकारचा तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना दणका; पीएफ व्याजदराविषयी मोठा निर्णय!

चाळकवाडी टोल नाका (नवे दर)

एकेरी प्रवास- ७५ रुपये
दुहेरी प्रवास – ११० रुपये

हिवरगाव पावसा टोलनाका (नवे दर)


एकेरी प्रवास- १०० रुपये
दुहेरी प्रवास- १४० रुपये

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.