Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात कलम 144 लागू; गड, किल्ले पर्यटन क्षेत्रात जमावबंदी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्यात जोरदार बारसतोय. राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे असे म्हणता येईल. महत्वाचं म्हणजे पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसामुळे पुढील धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि काही भागांमध्ये अतिवृष्टीचा होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यासह विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापुरसह पुणे, सातारा, पालघर, रायगड, नाशिक या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे पुणे जिल्हाधिका-यांकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लावण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाकडून पुढील 48 तासांमध्ये शहर आणि परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले,पर्यटन स्थळे तसेच धरण परिसरासह तलाव परिसरात 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत अतिमुसळधार पावसामुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पुणे महापालिकेने कंपन्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. पुढचे ४८ तास पुण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे महापालिकेनं खासगी कंपन्यांसह आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे. महत्वाचं म्हणजे शाळांना देखील सुट्टी शाहीर करण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.